Sameer Amunekar
दिवसाची सुरुवात सौम्य क्लिंजरने करा. यामुळे त्वचेतील नैसर्गिक तेल टिकून राहते आणि धूळ-माती साफ होते. त्वचा कोरडी पडली की सुरकुत्या लवकर येतात, त्यामुळे क्लिंजर निवडताना ते 'सल्फेट-फ्री' असेल याची काळजी घ्या.
क्लिंजिंगनंतर व्हिटॅमिन-सी किंवा हॅल्युरोनिक ॲसिड असलेले सीरम वापरा. व्हिटॅमिन-सी त्वचेतील कोलाजन वाढवते, ज्यामुळे त्वचा घट्ट राहते.
वय वाढताना त्वचा ओलावा गमावते. त्यामुळे चांगल्या प्रतीचे मॉइश्चरायझर लावणे विसरू नका. यामुळे त्वचेचा लवचिकपणा टिकून राहतो आणि फाईन लाईन्स कमी होतात.
सूर्याची अतिनील किरणे (UV Rays) सुरकुत्यांचे मुख्य कारण आहेत. घरी असाल किंवा बाहेर, दिवसा SPF 30+ असलेले सनस्क्रीन नक्की लावा.
रात्री झोपण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ल्याने रेटिनॉलयुक्त क्रीम किंवा सीरम लावा. हे पेशींच्या नूतनीकरणासाठी आणि सुरकुत्या कायमच्या घालवण्यासाठी सर्वात प्रभावी मानले जाते.
चेहऱ्याला खालून वरच्या दिशेने खोबरेल तेल किंवा बदामाच्या तेलाने ५ मिनिटे मसाज करा. यामुळे रक्तभिसरण सुधारते आणि त्वचा नैसर्गिकरित्या लिफ्ट होते.