Sameer Amunekar
जुन्या फोटोंमध्ये गोव्यातील घरे आणि सरकारी इमारतींवर स्पष्टपणे पोर्तुगीज प्रभावाचे दर्शन घडते. विशेषतः रंगीबेरंगी घरे, बाल्कनी आणि लाकडी खिडक्यांचे नक्षीकाम त्या काळातील सौंदर्याची साक्ष देतात.
आजच्या तुलनेत ६०-७० च्या दशकातील गोव्याचे समुद्रकिनारे अत्यंत शांत आणि कमी गर्दीचे होते. पर्यटकांपेक्षा तिथे स्थानिक कोळी बांधवांची आणि त्यांच्या होड्यांचीच जास्त वर्दळ असायची.
जुन्या ब्लॅक अँड व्हाईट फोटोंमध्ये गोव्यातील पुरुष 'हाफ पँट' आणि 'हॅट' मध्ये, तर महिला नऊवारी साडी किंवा पारंपारिक ख्रिश्चन गाऊनमध्ये पाहायला मिळतात.
त्या काळी गोव्याच्या रस्त्यांवर मोजक्याच विंटेज कार्स आणि सायकली दिसायच्या. सार्वजनिक वाहतुकीसाठी सायकल रिक्षा किंवा पायी चालणाऱ्यांची संख्या जास्त होती.
'बॅसिलिका ऑफ बॉम जीझस' किंवा 'मंगेशी मंदिर' यांसारख्या वास्तूंचे जुने फोटो पाहिले तर त्यांच्या सभोवतालचा परिसर अत्यंत निसर्गरम्य आणि मानवी हस्तक्षेपाशिवाय असलेला दिसतो.
मांडवी नदीच्या किनाऱ्यावर वसलेल्या पणजी शहराचे जुने फोटो पाहिले तर तिथे आधुनिक पुलांऐवजी लहान बोटी लोकांच्या प्रवासाचे मुख्य साधन असल्याचे लक्षात येते.