Sameer Amunekar
मडगाव हे दक्षिण गोवाचे प्रमुख शहर असून सांस्कृतिक व ऐतिहासिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे ठिकाण आहे. येथे फिरण्यासाठी अनेक सुंदर आणि आकर्षक ठिकाणे आहेत.
१६व्या शतकातील हे चर्च पोर्तुगीज स्थापत्यशैलीतील आहे. हे चर्च भव्य रचनेमुळं पर्यटकांना आकर्षित करतं.
स्थानिक मसाले, हस्तकलेच्या वस्तू, गोवन खाद्यपदार्थ आणि फळे-भाज्या खरेदीसाठी मडगाव मार्केट एक उत्तम ठिकाण.
मडगावपासून अवघ्या ६-७ किमी अंतरावर असलेला हा बीच शांत आणि सुंदर आहे. येथे वॉटर स्पोर्ट्स आणि सीफूडचा आनंद घेता येतो.
दामोदर मंदिर हे मडगावमधील हिंदू भाविकांसाठी एक महत्त्वाचे धार्मिक ठिकाण आहे. हे मंदिर भगवान दामोदर (भगवान शिवाचा एक अवतार) यांना समर्पित आहे.
तुलनेने कमी गर्दी असलेला हा बीच निसर्गप्रेमींसाठी उत्तम पर्याय आहे.