Madan Mahal Fort: शत्रूसाठी काळ आणि राज्यासाठी ढाल, राणी दुर्गावतींच्या शौर्याची धगधगती साक्ष 'मदन महल'; 900 वर्षांचा इतिहास

Manish Jadhav

गोंड राजांची शान

मध्य प्रदेशातील जबलपूर येथे असलेल्या ऐतिहासिक मदन महल किल्ल्याची निर्मिती 11व्या शतकात गोंड राजा मदन शाह यांनी केली होती. गोंड साम्राज्याच्या वैभवाचा हा किल्ला एक उत्तम नमुना मानला जातो.

Madan Mahal Fort | Dainik Gomantak

संरक्षणात्मक वॉच टॉवर

मदन महल किल्ल्याचा वापर प्रामुख्याने एक 'वॉच टॉवर' म्हणून केला जात असे. टेकडीवर असल्यामुळे येथून शत्रूच्या हालचालींवर लक्ष ठेवणे सोपे जात असे.

Madan Mahal Fort | Dainik Gomantak

राणी दुर्गावतींचं शौर्य

हा किल्ला महान विरांगना राणी दुर्गावती यांच्या शौर्याची साक्ष देतो. त्यांनी आपल्या कार्यकाळात या किल्ल्याचा वापर प्रशासकीय आणि लष्करी कामांसाठी केला.

Madan Mahal Fort | Dainik Gomantak

नैसर्गिक खडकावर उभारणी

किल्ल्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तो एका प्रचंड मोठ्या नैसर्गिक ग्रॅनाइट खडकावर (Granite Rock) बांधलेला आहे, ज्यामुळे तो आजही भक्कम स्थितीत आहे.

Madan Mahal Fort | Dainik Gomantak

बॅलन्सिंग रॉक

किल्ल्याच्या अगदी जवळ निसर्गाचा चमत्कार असलेला 'बॅलन्सिंग रॉक' आहे. हा एक प्रचंड मोठा दगड दुसऱ्या एका छोट्या दगडावर कोणत्याही आधाराशिवाय शतकानुशतके टिकून आहे.

Madan Mahal Fort | Dainik Gomantak

शत्रूंसाठी अभेद्य रचना

किल्ल्याची रचना अत्यंत साधी पण प्रभावी आहे. डोंगराळ भागात असल्यामुळे शत्रूला येथे पोहोचणे कठीण होते. किल्ल्यात गुप्त मार्ग आणि पाण्याचे टाकेही पाहायला मिळतात.

Madan Mahal Fort | Dainik Gomantak

पर्यटकांचे प्रमुख आकर्षण

भारतीय पुरातत्व विभागाच्या देखरेखीखाली असलेला हा किल्ला आज पर्यटकांसाठी एक महत्त्वाचे ऐतिहासिक स्थळ आहे. जबलपूरला भेट देणारे पर्यटक या किल्ल्याला आवर्जून भेट देतात.

Madan Mahal Fort | Dainik Gomantak

Belapur Fort: नवी मुंबईचा 'रॉयल' वारसा अन् चिमाजी अप्पांचा 'तो' ऐतिहासिक विजय... 500 वर्षांचा बेलापूर किल्ल्याचा धगधगता इतिहास

आणखी बघा