Sameer Amunekar
सांगली जिल्ह्यात मच्छिंद्रनाथांचे प्रमुख स्थान असलेला मच्छिंद्रगड ‘सोन्याचा डोंगर’ म्हणून ओळखला जातो. किल्ल्याला धार्मिक स्थानाचा “क” दर्जा मिळालेला आहे.
गडाच्या पश्चिमेला येडे मच्छिंद्रगड गावातून सिमेंटच्या पायऱ्या व रस्ता, तर ईशान्येला बेरडमाची गावातून सिमेंटच्या पायऱ्या बांधण्यात आलेल्या आहेत.
मुख्य डोंगररांगेपासून वेगळ्या असलेल्या या डोंगरावर टेहळणीसाठी किल्ला बांधलेला होता.
गडाच्या पश्चिम बुरुज व बाजूची तटबंदी नव्याने बांधून त्यावर सिमेंटचा घुमट उभारून सुशोभीकरण करण्यात आले आहे.
पायऱ्यांच्या मार्गाने गडाच्या सर्वोच्च माथ्यावर गेल्यावर गहीनीनाथांचे मंदिर आहे.
थोडे खाली उतरल्यावर मच्छिंद्रनाथांचे भव्य मंदिर आहे. परिसरात तुटलेल्या तोफा विखुरलेल्या असून दोन चांगल्या अवस्थेतील तोफा मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ लाकडी गाड्यावर ठेवलेल्या आहेत.
मंदिरातील गर्भगृहाच्या दरवाज्यावर संगमरवरी पाटीवर १९३१ ते १९३६ या काळात लवणमाची व बेरडमाची गावकऱ्यांनी ९२५१ रुपये खर्च करून मंदिर बांधल्याचा उल्लेख आहे.