Akshata Chhatre
तुम्ही घरात सिलेंडर वापरता ना? पण सिलेंडर वापरताना आवश्यक असणाऱ्या सगळ्याच गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?
सिलेंडर वापरताना काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं असतं, जसं की सिलेंडरची एक्सपायरी डेट.
आता हे कसं ओळखाल? खूप सोपं आहे आणि आज आपण तेच जाणून घेणार आहोत.
सिलेंडरच्या वरच्या बाजूला एक कोड असतो, ज्या कोडमुळे सिलेंडरची एक्स्पायरी ओळखणं सोपं होतं.
सिलेंडरवर A,B,C,D असा कोड असतो आणि त्यापुढे कोणतं वर्ष सुरु आहे तो आकडा असतो.
या अक्षरांमध्ये तीन महिने वाटून दिलेले असता, ज्यावरून तारीख ओळखता येते.