Manish Jadhav
आमिर खानचा लेक जुनैद खान 'लवयापा' नावाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहे.
हा चित्रपट बऱ्याच काळापासून चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी, या चित्रपटातील एक सॉंग रिलीज झाले होते.
आता निर्मात्यांनी 'लवयापा' चा ट्रेलर रिलीज केला आहे. शुक्रवारी (10 जानेवारी) मुंबईत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, जिथे आमिर खानने 'लवयापा'चा ट्रेलर लॉन्च केला. 2 मिनिटे 47 सेकंदांचा हा ट्रेलर सध्या धूमाकूळ घालत आहे.
'लवयापा' हा अद्वैत चंदन दिग्दर्शित एक रोमँटिक-कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेत जुनैदबरोबर बोनी कपूरची धाकटी लेक खूशी कपूर आहे.
या चित्रपटात निर्माते Gen-Z कपलची लव्ह स्टोरी दाखवणार आहेत, ज्याची झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे.
प्रसिद्ध अभिनेते आशुतोष राणा यांनी या चित्रपटात खूशी कपूरच्या वडिलांची भूमिका साकारली आहे.
खूशी आणि जुनैद एकमेकांवर प्रेम करतात. जुनैद खूशीच्या वडिलांना भेटण्यासाठी तिच्या घरी जातो. जेव्हा तो तिच्या वडिलांना सांगतो की, तो तिच्याशी लग्न करु इच्छितो, तेव्हा आशुतोष राणा असे एक पाऊल उचलतात ज्यामुळे जुनैद आणि खूशीच्या आयुष्यात वादळ येते.
निर्मात्यांनी हा चित्रपट व्हॅलेंटाईन डेच्या एक आठवडा आधी प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. 7 फेब्रुवारी रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. जुनैदप्रमाणेच खूशी देखील पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.