Akshata Chhatre
कोरियन महिलांची चमकदार त्वचा कोणत्याही महागड्या ट्रीटमेंटमुळे नाही, तर नियमित आणि सोप्या फेस योगामुळे असते.
भुवयांच्या मधोमध सौम्य दाब द्या आणि हेअरलाईनपर्यंत वर घ्या. दिवसातून २ वेळा केल्यास सुरकुत्या कमी होतात.
दोन्ही तळहात घासून डोळ्यांवर हलकं ठेवून कानाकडे फिरवा. सूज, डार्क सर्कल्स आणि थकवा दूर होतो.
हनुवटीवर हात ठेवून सौम्य दाब देत कानाकडे वर उचला. जॉ लाईन शार्प होते आणि त्वचा घट्ट होते.
मानेपासून कपाळापर्यंत वरच्या दिशेने मसाज करा. एलोवेरा जेल किंवा सौम्य क्रीम वापरल्यास फायदा अधिक.
हे सर्व व्यायाम फक्त दोन मिनिटं घेतात. नियमितपणे केल्यास १ आठवड्यातच बदल दिसायला लागतो.