Sameer Amunekar
नारळ तेलात काही कडीपत्त्याची पानं टाकून गरम करा. हे मिश्रण आठवड्यातून दोनदा केसांच्या मुळांवर लावा. केस मजबूत व दाट होतात.
कांद्याचा रस केसांच्या मुळांमध्ये लावल्याने रक्तप्रवाह सुधारतो आणि केसांची वाढ वेगाने होते. वास कमी करण्यासाठी नंतर लिंबूपाणी वापरा.
काही कोवळी आंब्याची पानं आणि खोबरेल तेल मिक्स करून केसांच्या टोकांवर लावा. हे केसांना नैसर्गिक पोषण देतं आणि तुटणे थांबवतं.
अंडी, दूध, डाळी, बदाम आणि हिरव्या भाज्या नियमित खा. शरीराला मिळालेलं योग्य पोषणच केसांच्या वाढीचं खरं ‘फ्युएल’ आहे.
गरम टॉवेलने केसांना स्टीम दिल्यास तेल खोलवर शोषलं जातं. यामुळे केस मऊ, लांब आणि चमकदार होतात.
केसांवर रंग, स्प्रे किंवा स्ट्रेटनिंग उत्पादने कमी वापरा. हेअर डॅमेज थांबवणे म्हणजे वाढीसाठी पहिलं पाऊल.
रात्री हलक्या हाताने केस विंचरल्याने रक्तप्रवाह वाढतो आणि नैसर्गिकरित्या वाढीस चालना मिळते.