Manish Jadhav
लोहागढ किल्ल्याला त्याच्या नावाप्रमाणेच 'अभेद्य' किल्ला म्हणून ओळखले जाते. या किल्ल्यावर अनेक हल्ले झाले, विशेषतः ब्रिटिशांनी वेळा हल्ला केला, तरीही ते हा किल्ला जिंकू शकले नाहीत.
या किल्ल्याचे बांधकाम 1732 मध्ये जाट राजा महाराजा सूरजमल यांनी सुरु केले होते. हा किल्ला संरक्षणाच्या दृष्टीने तयार करण्यात आला होता, त्यामुळे त्याची रचना इतर राजस्थानी किल्ल्यांप्रमाणे भव्य आणि कलात्मक नसून साधी आणि मजबूत आहे.
या किल्ल्याची सर्वात मोठी खासियत म्हणजे त्याची जाड आणि मजबूत मातीची तटबंदी. ही तटबंदी इतकी मजबूत होती की, शत्रूंच्या तोफांचे गोळे यामध्ये अडकून तटबंदीला धक्का लागत नव्हता.
किल्ल्याच्या संरक्षणासाठी त्याच्याभोवती एक मोठा आणि खोल खंदक आहे. मोतीझील धरणातून सुजानगंगा कालव्याद्वारे या खंदकात पाणी आणले जात असे, ज्यामुळे शत्रूंना किल्ल्यापर्यंत पोहोचणे जवळजवळ अशक्य होते.
या किल्ल्यात दोन महत्त्वाचे विजयस्तंभ आहेत. जवाहर बुर्ज हा महाराजा जवाहर सिंह यांनी दिल्लीवर मिळवलेल्या विजयाच्या स्मरणार्थ बांधला होता. तर, फतेह बुर्ज हा महाराजा रणजीत सिंह यांनी ब्रिटिश सैन्याचा पराभव केल्याच्या आनंदात उभारला होता.
किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार 'अष्टधातू' पासून बनलेले आहे. हा दरवाजा सुरुवातीला चित्तौडगढ किल्ल्यावर होता. दिल्लीवर स्वारी केल्यानंतर हा दरवाजा तेथून आणून राजा जवाहर सिंह यांनी लोहागढ किल्ल्यावर बसवला.
किल्ल्याच्या आत अनेक राजेशाही इमारती आहेत, ज्यात Kishori Mahal, Mahal Khas आणि Kothi Khas यांचा समावेश आहे. यातील काही इमारतींना राजस्थान सरकारने 'राज्य संरक्षित स्मारक' म्हणून घोषित केले आहे.
हा किल्ला केवळ संरक्षणासाठीच नाही, तर तत्कालीन जाट शासकांच्या साध्या आणि कार्यात्मक जीवनशैलीचे प्रतीक आहे.