Sameer Amunekar
महाराष्ट्र हे गडकिल्ल्यांचे राज्य म्हणून ओळखले जाते. सह्याद्रीच्या रांगांमध्ये उभे असलेले असंख्य किल्ले आजही मराठ्यांच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देतात.
प्रत्येक गडाचे आपले वैशिष्ट्य आहे. पण यापैकी एक किल्ला असा आहे ज्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले होते. कारण, याच गडावर स्वराज्याचा मौल्यवान खजिना लपवला गेला होता.
हा गड म्हणजे लोहगड किल्ला. पुणे जिल्ह्यातील इंद्राणी खोऱ्यात, समुद्रसपाटीपासून तब्बल 3400 फूट उंचीवर हा किल्ला भक्कमपणे उभा आहे.
लोहगड किल्ला 18व्या शतकात बांधण्यात आला आणि त्यावर मराठा शासकांसोबत विदर्भ शासकांचेही अधिपत्य राहिले होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या किल्ल्याला विशेष महत्त्व होते कारण इथे स्वराज्याचा मौल्यवान खजिना ठेवला जात असे.
हा किल्ला अभेद्य होता, शत्रूला जवळजवळ अशक्यप्राय वाटणारा, तसेच शत्रूच्या नजरेआड असल्यामुळे खजिना सुरक्षित ठेवण्यासाठी उत्तम जागा मानली जात होती.
मराठा साम्राज्यातील अनेक शिलेदार या किल्ल्याचे रक्षण करत असत जेणेकरून खजिन्याची सुरक्षितता कायम राहील.
इतिहासकारांच्या मते, मराठा साम्राज्याने सूरतेवर केलेल्या लुटीतून मिळालेला मोठा ऐवज देखील या किल्ल्यात ठेवण्यात आला होता.