Sameer Amunekar
लोहगड हा अतिशय प्राचीन किल्ला असून त्याची रचना सुमारे २००० वर्षांपूर्वीची (सातवाहन कालीन) असल्याचे मानले जाते.
हा किल्ला पुण्यापासून ५७ किमी तर मुंबईपासून १०३ किमी अंतरावर, लोणावळ्याजवळील मावळ तालुक्यात स्थित आहे.
सुरतेच्या लुटीनंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी आणलेला सर्व खजिना याच किल्ल्यावर सुरक्षित ठेवला होता, यावरून याच्या मजबुतीचा अंदाज येतो.
युनेस्कोने (UNESCO) पुण्यातील लोहगड किल्ल्याला जागतिक वारसा (World Heritage) स्थळाचा दर्जा दिला आहे..
लोहगड हा एक अतिशय मजबूत आणि बुलंद दुर्ग आहे. याची तटबंदी आणि बुरुज आजही इतिहासाची साक्ष देत दिमाखात उभे आहेत.
गडावर प्रवेश करण्यासाठी गणेश, महादरवाजा, हनुमान, नारायण (नाना) आणि त्र्यंबकेश्वर असे पाच मुख्य दरवाजे आहेत.
घाटातील एका विशिष्ट खिंडीतून या गडावर जाण्याचा मार्ग आहे, जो लष्करीदृष्ट्या अत्यंत सुरक्षित मानला जात असे