Ashutosh Masgaunde
भाजपचे संस्थापक सदस्य आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना 'भारत रत्न' पुरस्कार जाहीर झाला आहे.
नुकतेच उद्घाटन झालेल्या राम मंदिर आंदोलनात लालकृष्ण अडवाणी यांचा सिंहाचा वाटा होता.
लालकृष्ण अडवाणी यांनी गुजरातमधील सोमनाथ ते श्री रामजन्मभूमी अयोध्या अशी रथयात्रा 25 सप्टेंबर 1990 रोजी सुरू केली होती. अयोध्येत भव्य मंदिर उभारण्याच्या संकल्पाने सुरू केली होती.
23 ऑक्टोबर 1990 रोजी समस्तीपूर येथील पटेल मैदानावर लालकृष्ण अडवाणी यांची एक मोठी जाहीर सभा होती. यासाठी भारतीय जनता पक्ष, आरएसएस, विद्यार्थी परिषद यांच्यासह संघाच्या सर्व संलग्न संघटनांनी जोरदार तयारी केली होती.
लालकृष्ण अडवाणींची रथयात्रा समस्तीपूरात पोहचली तेव्हा जनसागर उसळला होता. ठिकठिकाणी लोक रस्त्याच्या दुतर्फा स्वागतासाठी उभे होते.
23 ऑक्टोबर रोजी बिहारचे तत्कालीन मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांनी रथयात्रेमुळे राज्याची शांतता व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून लालकृष्ण अडवाणी यांना अटक केली होती.
लालकृष्ण अडवाणी यांना अटक झाल्यानंतर कारसेवक संतप्त झाले आहे. आणि दुसऱ्या दिवशी आयोध्येत लाखो कारसेवक जमा झाले. यावेळी पोलिसांच्या गोळीबारात अनेकांचा मृत्यू झाला.