Manish Jadhav
आजच्या काळात इंटरनेटशिवाय जीवन जगण्याची कल्पना करणे अशक्य आहे. इंटरनेटमुळे प्रत्येक काम सोपे झाले आहे.
पण तुम्हाला माहित आहे का की कोणत्या देशांची लोकसंख्या सर्वाधिक इंटरनेट वापरते? चला तर मग याबद्दल जाणून घेऊया...
अलिकडेच वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सने प्यू रिसर्चच्या आधारे काही डेटा शेअर केला आहे.
दक्षिण कोरिया हा देश इंटरनेट वापराच्या बाबतीत आघाडीवर आहे. या देशातील सुमारे 99 टक्के लोक इंटरनेट वापरतात.
मलेशिया हा देश या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. येथील सुमारे 94 टक्के लोक इंटरनेट वापरतात.
सिंगापूर तिसऱ्या स्थानावर आहे, जिथे देशातील सुमारे 94 टक्के लोक इंटरनेट वापरतात.
जपान या यादीत चौथ्या स्थानी आहे, जिथे 88 टक्के लोक इंटरनेट वापरतात.
इंडोनेशिया या यादीत पाचव्या स्थानी आहे. येथील सुमारे 78 टक्के लोक इंटरनेट वापरतात.
आपला भारत देश या यादीत सहाव्या स्थानी आहे. देशातील एकूण लोकसंख्येपैकी 56 टक्के लोक इंटरनेट वापरतात.