गोमन्तक डिजिटल टीम
गोव्यात आलेल्या प्रत्येकाने नक्कीच भेट द्यावी ती म्हणजे इथल्या चर्चना. विविध भागांमध्ये स्थित या चर्चेसचा स्वतःचा असा वेगळा इतिहास आहे.
पैकी सर्वात प्रसिद्ध म्हणजे ओल्ड गोव्याची चर्च, ज्याला Basilica of Bom Jesus असंही म्हटलं जातं. याचा अर्थ लहानपणीचा जीजस असा होतो. या चर्चची बांधणी 1605 मध्ये पूर्ण झाली होती.
ही गोव्यातील अनेक जुन्या चर्च पैकी एक आहे. याची बांधणी वर्ष 1555 मध्ये करण्यात आली होती आणि पणजीपासून 7 किलोमीटर अंतरावर या चर्चला भेट देता येते. गोव्यातील प्रसिद्ध थ्री किंग्सचे फेस्त 6 जानेवारी रोजी इथेच साजरे केले जाते.
ही चर्च सेंट कॅथेद्रलच्या मागे पाहायला मिळते. वर्ष 1517 मध्ये एक कोपेल म्हणून बनवलेली ही चर्च पुढे 1521 मध्ये एका चर्चमध्ये रूपांतरित करण्यात आली. सेंट फ्रान्सिसच्या नावे बांधलेली ही चर्च 1616 मध्ये पुन्हा निर्माण करण्यात आली होती.
सेंट कॅजेटनला समर्पित ही चर्च 1661 मध्ये बनवण्यात आली होती.
या कोपेलची बांधणी वर्ष 1510 मध्ये अल्बुकर्कने गोव्यावर मिळवलेल्या विजयामुळे केली होती.
या चर्चला गोव्यातील सर्वात मोठी चर्च म्हणून ओळखलं जातं. ही चर्च अलेक्झांड्रियाच्या कॅथरीनला समर्पित आहे. जगभरातील अनेक सुंदर चर्चेस पैकी एक म्हणून या चर्चचा उल्लेख केला जातो.