Sameer Amunekar
पावसाळ्यात सहज वाढणाऱ्या पालेभाज्या निवडा. पालक, मेथी, चवळी, अंबाडी, कोथिंबीर, शेपू यांसारख्या भाज्या या हंगामात चांगल्या वाढतात.
मोठी प्लास्टिक बादली, कुंडी, जुने टब, किंवा थर्माकोलचे बॉक्स वापरून तुम्ही घराच्या गच्चीवर किंवा गॅलरीत शेती करू शकता. यामध्ये पाणी निचरा होण्यासाठी खालच्या बाजूला भोक पाडा.
घरगुती ओला कचरा, सडलेली फळभाजी, गोमूत्र, गांडूळ खत यांचा वापर करून जमिनीत सेंद्रिय पोषण द्या. यामुळे भाजी पौष्टिक आणि विषमुक्त राहते.
पालेभाज्यांची बियाणं हलक्या हाताने टाकून त्यावर पातळ माती टाका. रोज सकाळी किंवा संध्याकाळी पाणी द्या, पण पाणी साचू देऊ नका.
लसणाचं किंवा हळदीचं पाणी फवारल्यास कीटकांपासून पालेभाजीचं संरक्षण करता येतं. झाडांवर चांगली हवा खेळती राहावी यासाठी त्यांची योग्य फांदी छाटणी करा.
नियमित निगा घेतल्यास १०-१५ दिवसांत तुम्हाला ताजी पालेभाजी मिळू लागते. सेंद्रिय शेतीमुळे आरोग्यदायी आहार मिळतो आणि रासायनिक खतांचा त्रासही टाळता येतो.