Goa: 'या' सहा बॉलिवूड स्टार्संनी गोव्याला बनवलं आपलं घर

Manish Jadhav

गोवा

गोवा हे बॉलीवूड कलाकारांचं सुट्ट्या एन्जॉय करण्याचं आवडतं ठिकाणं. अनेकदा हे कलाकार गोव्यात सुट्टी घालवताना दिसतात. काहींनी तर गोव्याला आपलं घर बनवलं.

Goa | Dainik Gomantak

बॉलिवूड कलाकारांची आलिशान घरं

होय, बॉलिवडूमधील आघाडीचे कलाकार ज्यामध्ये मग अक्षय कुमार, अभय देओल, प्रियांका चोप्रा, इम्रान हाश्मी यांची गोव्यात आलिशान घरे आहेत.

Luxury homes | Dainik Gomantak

अभय देओल

अभय देओलने काही वर्षांपूर्वी उत्तर गोव्यात आपले इको-फ्रेंडली पण आलिशान घर बांधलं. या आलिशान घरामध्ये एक आउटडोअर स्विमिंग पूल, एक भव्य लॉन आणि काचेचे मोठे दरवाजे आहेत.

Abhay Deol | Dainik Gomantak

इम्रान हाश्मी

इम्रान हाश्मीने 2010 मध्ये आपल्या कुटुंबासोबत क्वालिटी टाइम स्पेंड घालवण्यासाठी गोव्यात करोडोंचं पेंटहाऊस खरेदी केलं. आधुनिक सुविधांनी हे पेंटहाऊस सुसज्ज आहे.

Imran Hashmi | Dainik Gomantak

पूजा बेदी

पूजा बेदीचे उत्तर गोव्यातील बार्देश येथे आलिशान घर आहे.

Pooja Bedi | Dainik Gomantak

आफताब शिवदासानी

आफताब शिवदासानीने 2014 मध्ये प्रीमियम गोवन-पोर्तुगीज शैलीतील आलिशान घर विकत घेतलं. कळंगुटपासून जवळच असलेल्या नागोवा या सुंदर गावात त्याचा लक्झरी व्हिला आहे.

Aftab Shivdasani | Dainik Gomantak

प्रियांका चोप्रा

गोव्यातील बागा बीचजवळ प्रियांका चोप्राचा एक आलिशान व्हिला आहे. आधुनिक सुविधा, गोवा-पोर्तुगीज-शैलीचा हा व्हिला आहे.

Priyanka Chopra | Dainik Gomantak

अक्षय कुमार

अक्षय कुमारचा हणजूण बीचजवळ पोर्तुगीज-शैलीतील आकर्षक बंगला आहे. तो नेहमी गोव्यातील या घराचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो.

Akshay Kumar | Dainik Gomantak