Goa, Dear Zindagi Road: एक सैर 'डिअर जिंदगी रोड'वर; गोव्याचं दिलं

Manish Jadhav

गोव्याचं पर्यटन

पावसाळ्यात गोव्याचं निसर्ग सौंदर्य प्रत्येकाला खुनावतं. पर्यटक मोठ्याप्रमाणात गोव्यातील विविध प्रसिद्ध ठिकाणांना भेटी देण्यासाठी गर्दी करतात. यामध्ये मग वॉटरफॉल्स असो की बॉलिवूड चित्रपटांचं शूटिंग झालेली नैसर्गिक ठिकाणे असो...

Goa, Dear Zindagi Road | Dainik Gomantak

डिअर जिंदगी रोड

तुम्ही प्रत्येकाने शाहरुख खान आणि आलिया भट्ट यांचा 'डिअर जिंदगी' चित्रपट नक्की पाहिला असेल. या चित्रपटात शाहरुख आणि आलिया सायकलवरुन एका रोडवरुन जाताना दिसतात. यानंतर हा रोड इतका फेमस झाला की आता गोव्यात येणारा प्रत्येकजण हा रोड पाहतो.

Goa, Dear Zindagi Road | Dainik Gomantak

पर्यटकांचं आकर्षणाचं केंद्र

रोडच्या दोन्ही बाजूला असणारी नारळाची झाडं पर्यटकांना आकर्षित करतात. पर्यटक मोठ्याप्रमाणावर हा रोड पाहण्यासाठी येतात. तुम्हीही गोव्याला येत असाल तर नक्की हा रोड पाहा.

Goa, Dear Zindagi Road | Dainik Gomantak

सेल्फीचा मोह आवरत नाही!

इथे येणाऱ्याला सेल्फी, फोटो काढण्याचा बिलकुल मोह आवरत नाही.

Goa, Dear Zindagi Road | Dainik Gomantak

डिअर जिंदगी रोडचं मूळ नाव पर्रा रोड

डिअर जिंदगी रोडचं मूळ नाव पर्रा रोड आहे. मात्र शाहरुख आणि आलिया यांच्या डिअर जिंदगी चित्रपटामुळे या रोड आणखी ओळखला जावू लागला.

Goa, Dear Zindagi Road | Dainik Gomantak

पर्रा गावाची ओळख

पर्रा हे गोव्याचे स्वर्गीय माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे वडिलोपार्जित गाव आहे. हा रोड पर्रा गोवाची ओळख बनला आहे.

Goa, Dear Zindagi Road | Dainik Gomantak