Sameer Amunekar
चांगला मुलगा सहसा शांत, समजूतदार आणि संयमी असतो. लग्नानंतर वाद निर्माण झाले तरी तो परिस्थिती हाताळू शकतो.
फक्त मुलगा चांगला असणे पुरेसे नाही, पण घर, करिअर आणि नात्यांच्या जबाबदाऱ्या तो कशा घेतो हे महत्वाचं ठरतं.
आयुष्यभराचा पार्टनर ठरण्यासाठी आर्थिकदृष्ट्या स्थिर असणं खूप आवश्यक आहे. ‘चांगला स्वभाव’ आणि ‘सुरक्षित भविष्य’ या दोन्ही गोष्टींचा संगम महत्वाचा.
चांगला नवरा होण्यासाठी प्रेम, आदर आणि संवादाची सतत गरज असते. फक्त गोड बोलणं नाही तर कठीण काळात साथ देणं महत्त्वाचं.
लग्नानंतर जीवनात बदल होतात. चांगला पार्टनर तोच जो बदलांना सकारात्मकतेने स्वीकारतो आणि एकत्र पुढे जातो.
स्त्रीसाठी नवऱ्याचा भावनिक आधार महत्त्वाचा असतो. चांगला मुलगा जर भावनिक आधार देत असेल तर नातं आणखी मजबूत होतं.
प्रेम हे सुरुवातीला सगळे दाखवतात, पण ते टिकवून ठेवणं महत्वाचं आहे. ‘चांगला मुलगा’ तोच परफेक्ट पार्टनर ठरतो जो आयुष्यभर आपल्या जोडीदाराचा आदर करतो.