Manish Jadhav
चिकू या फळाचे सेवन करणे आरोग्यासाठी चांगले मानले जाते. आरोग्य चांगले राहण्यासाठी अनेकजण डाएटमध्ये चिकूचा समावेश करतात.
फायबरने समृद्ध असलेले चिकू पचनासाठी एक उत्कृष्ट फळ आहे. मात्र जास्त प्रमाणात चिकू खाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकते.
चला तर मग आज (28 फेब्रुवारी) या वेबस्टोरीच्या माध्यमातून चिकू खाणे कोणी टाळावे याबाबत जाणून घेऊया...
मधुमेह असलेल्या रुग्णांनी चिकू या फळाचे सेवन करु नये. मधुमेहांनी जर चिकूचे सेवन केले तर त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते.
तुम्हाला जर ॲलर्जी असेल तर चिकूचे सेवन करणे टाळावे. काही लोकांना चिकूचे सेवन केल्याने ॲलर्जी होते कारण त्यात टॅनिन आणि लेटेक्स नावाची रसायने असतात.
जास् प्रमाणात चिकू खाल्ल्याने पाचन तंत्रावर दबाव येऊ शकतो, ज्यामुळे पचनाच्या अनेक समस्या वाढू शकतात.