गोव्यातल्या प्रसिद्ध किनाऱ्यांसोबत 'हे' सुंदर किनारे तुम्ही पाहिले आहेत का?

गोमन्तक डिजिटल टीम

गोव्यातील किनारे

गोव्यात असे अनेक किनारे आहेत जे पर्यटकांना फारसे माहित नाहीत पण ते पाहिल्यानंतर तुम्ही त्यांच्या प्रेमात पडाल.

Goa Hidden Beach | Dainik Gomantak

ककोलेम किनारा

जर तुम्हाला गर्दीपासून दूर आणि सुंदर ठिकाण अनुभवायचे असेल तर तुमच्यासाठी ककोलेम किनारा एक उत्तम पर्याय आहे.

Kakolem Beach | Dainik Gomantak

अश्वेम किनारा

तुम्हाला शांतता आवडत असेल तर या विस्तीर्ण किनाऱ्याला नक्की भेट द्या. ऑक्टोबर ते मार्च हा अश्वेम बीचला भेट देण्याचा उत्तम काळ आहे.

Ashwem Beach | Dainik Gomantak

बटरफ्लाय किनारा

फुलपाखरासारखा आकार असणारा हा अतिशय निसर्गरम्य किनारा आहे. सभोवताली असणारी हिरवीगार झाडे याच्या सौंदर्यात आणखीन भर घालतात.

butterfly beach | Dainik Gomantak

माजोर्डा बीच 

माजोर्डा समुद्र किनाऱ्यावर गेल्यावर तेथील निळेशार पाणी आणि स्वच्छ किनारा तुमच्या डोळ्यांना आनंद देतो. गर्दीपासून दूर असल्यामुळे तुम्ही इथे शांततेत वेळ घालवू शकता.

majorda beach | Dainik Gomantak

वायंगणी किनारा

हा छोटासा आणि नयनरम्य असा किनारा नक्कीच अनुभवावा असा आहे. इथे तुम्ही वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेऊ शकता.

Vaingunim Beach | Yandex
Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी येथे क्लिक करा