Sameer Panditrao
रत्नागिरी जिल्हयात अनेक सुंदर समुद्र किनारे आहेत.
रत्नागिरी ते गणपतीपुळे रस्त्यावर नेवरे गावापाशी एक सुंदर विस्तीर्ण किनारा आहे.
याला काजिरभाटी या नावाने ओळखले जाते.
हा परिसर खूप शांत आहे. इथे प्रचंड प्रमाणात सुरुची झाडे आहेत.
इथून आरेवारेचा प्रसिद्ध परिसर सुरु होतो.
बायोल्युमिनेसेन्स मुळे अनेकदा इथे रात्री समुदात निळा इफेक्ट दिसतो.
तुम्हाला कमी गर्दीचे, शांत विस्तीर्ण किनारे आवडत असतील तर इथे भेट द्या.