Sameer Panditrao
कोकण परिसर सुंदर किनारे, किल्ले आणि मंदिरे यांनी नटलेला आहे.
आज आपण कोकणातील एका सुंदर रस्त्याची माहिती घेऊ जो दोन गावांना जोडतो.
हा रस्ता देवगड आणि कुणकेश्वर या ठिकाणांना जोडतो.
देवगड, कुणकेश्वर दोन्ही ठिकाणे प्रसिद्ध आहेत. कुणकेश्वराचे शिवमंदिर तर पाहण्यासारखे आहे.
या रस्त्यावर फिरताना समुद्र एका बाजूने साथ देतो. अनेक विलक्षण जागा येथे पाहता येतात.
सुंदर गावे, आंब्याची झाडी यामुळे हा प्रवास नक्की करावा असा आहे.
या २० मिनिटाच्या रस्त्यावर तुम्हाला खवळे गणेश मंदिर, तारामुंबरी - मिठमुंबरी किनारे , तिथला सुंदर पूल पाहता येईल.