Sameer Panditrao
लिंबू पाणी शरीराला हायड्रेट ठेवते, पचन सुधारते. यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते.
लिंबू पाण्यात असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि फॅट बर्निंग गुणधर्म वजन कमी करण्यास मदत करतात.
व्हिटॅमिन सी मुळे इम्युनिटी वाढते आणि सर्दी-पडसं यासारख्या आजारांपासून बचाव होतो.
पण एक लक्षात घ्या, अति लिंबू पाणी पिण्याने पोटदुखी, जुलाब, मळमळ अशा समस्या उद्भवू शकतात.
लिंबामधील आम्ल दातांचे एनामेल कमजोर करू शकते. त्यामुळे लिंबू पाणी पिण्यानंतर पाणी पिणे महत्त्वाचे.
लिंबू पाण्यातील आम्लामुळे काहीवेळा तोंड येण्याचा त्रास होऊ शकतो.
लिंबू पाणी फायदेशीर असले तरी ते प्रमाणातच प्या.