Sameer Amunekar
लिंबूमध्ये भरपूर प्रमाणात Vitamin C असते. हे कोलेजन वाढवण्यास मदत करते, ज्यामुळे त्वचा घट्ट आणि चमकदार राहते.
लिंबू पाण्यात 1 चमचा मध मिसळा. मध त्वचेला आतून मॉइश्चर देतो आणि सुरकुत्या कमी होण्यास मदत करतो.
1 चमचा चिया सीड्स रात्री पाण्यात भिजवून सकाळी लिंबू पाण्यात मिसळा. यामध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिड्स असतात, जे त्वचा तरुण ठेवतात.
चिमूटभर हळद घातल्यास शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. याचा थेट फायदा त्वचेवर दिसून येतो.
हे मिश्रण सकाळी रिकाम्या पोटी प्यायल्यास मेटाबॉलिझम सुधारतो आणि त्वचा नैसर्गिकरित्या ग्लो करते.
फक्त हे पाणीच नव्हे, तर दिवसभर पुरेसे पाणी पिणेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्वचा हायड्रेट राहिल्यास सुरकुत्या उशिरा येतात.
नियमित सेवन केल्यास 7 ते 10 दिवसांत त्वचेतील कोरडेपणा कमी होतो आणि चेहऱ्यावर ताजेपणा जाणवतो.