Akshata Chhatre
कांद्यामध्ये सल्फर असतो, जो कोलाजेन तयार करतो आणि केसांची मुळे मजबूत करून वाढीला मदत मिळते.
ताज्या कांद्याचा रस काढा आणि टाळूवर लावा. ३० मिनिटांनंतर सौम्य शॅंपूने धुवा.
२ टेबलस्पून कांद्याचा रस आणि २ टेबलस्पून गरम खोबरेल तेल एकत्र करा. हे मिश्रण टाळूवर लावा.
कांद्याचा रस आणि एरंडेल तेल मिसळून केसांच्या मुळांवर लावा यामुळे केस दाट होतात.
१ अंडं आणि २ टेबलस्पून कांद्याचा रस मिसळा. हे केसांवर मास्कप्रमाणे लावा आणि नंतर धुवा.
कांद्याचे हे उपाय आठवड्यातून २ वेळा केल्यास केसांची वाढ होते आणि त्यांची चमक टिकते.