Pranali Kodre
भारत विरुद्ध इंग्लंड संघात कसोटी मालिकेतील दुसरा सामना 2 फेब्रुवारी 2024 रोजी विशाखापट्टणमला सुरु झाला आहे.
या सामन्यात भारताकडून पहिल्या डावात यशस्वी जयस्वालने 290 चेंडूत 209 धावांची खेळी केली. यात त्याने 19 चौकार आणि 7 षटकार मारले.
दरम्यान, हे जयस्वालने पहिलेच द्विशतक आहे. तसेच जयस्वाल कसोटीत द्विशतक करणारा भारतचा चौथा डावखुरा फलंदाज आहे.
यापूर्वी विनोद कांबळी, सौरव गांगुली आणि गौतम गंभीर या डावखुऱ्या फलंदाजांनी भारताचासाठी कसोटीत द्विशतके केली आहेत.
विनोद कांबळीने कसोटीत दोन द्विशतके भारतासाठी केली आहेत. त्याने दोन्ही द्विशतके १९९३ साली केली आहेत. त्याने झिम्बाब्वेविरुद्ध दिल्लीमध्ये 227 धावांची, तर मुंबईत इंग्लंडविरुद्ध 224 धावा केल्या होत्या.
गांगुलीने 2007 साली पाकिस्तानविरुद्ध बंगळुरू कसोटीत 239 धावांची द्विशतकी खेळी केली होती.
त्याचबरोबर गौतम गंभीरने 2006 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध दिल्लीत झालेल्या कसोटीत 206 धावांची द्विशतकी खेळी केली होती.