U19 World Cup: भारतीय युवा संघ सलग पाचव्यांदा सेमीफायनलमध्ये

Pranali Kodre

19 वर्षांखालील वनडे वर्ल्डकप 2024 स्पर्धा

दक्षिण आफ्रिकेत 19 वर्षांखालील वनडे वर्ल्डकप 2024 स्पर्धा खेळली जात आहे.

U19 World Cup | Instagram/cricketworldcup

उपांत्य फेरी

या स्पर्धेत भारतीय युवा संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.

U19 World Cup | India Team | X/BCCI

सलग पाचव्यांदा उपांत्य फेरीत

भारतीय युवा संघाने 19 वर्षांखालील वनडे वर्ल्डकप स्पर्धेत उपांत्य फेरीत प्रवेश करण्याची ही सलग पाचवी वेळ आहे.

U19 World Cup | India Team | X/BCCI

मागील चार स्पर्धा

यापूर्वी भारतीय युवा संघाने 2016, 2018, 2020 आणि 2022 साली झालल्या अखेरच्या चार 19 वर्षांखालील वनडे वर्ल्डकप स्पर्धेतही उपांत्य फेरी गाठली होती.

U19 World Cup 2022 | India Team | X/ICC

गतविजेते

भारतीय संघ यंदा गतविजेता म्हणून खेळत असून या स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघही आहे.

U19 World Cup | India Team | X/BCCI

विजेतेपद

भारतीय युवा संघाने आत्तापर्यंत 2000, 2008, 2012, 2018 आणि 2022 असे पाचवेळा 19 वर्षांखालील वर्ल्डकपचे विजेतेपद जिंकले आहे.

Virat Kohli | Twitter

अपराजीत भारतीय संघ

दरम्यान 19 वर्षाखालील वर्ल्डकप 2024 स्पर्धेत भारतीय युवा संघाने साखळी फेरी आणि सुपर सिक्स फेरीतील सर्व सामने जिंकत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.

U19 World Cup | India Team | X/ICC

भारतात कसोटी सामना खेळणारे 5 सर्वात वयस्कर वेगवान गोलंदाज

James Anderson | ANI