Akshata Chhatre
"कदाचित मी काही वेगळं केलं असतं तर..." हा विचार करणं सोडा. नात्यातील बिघाडासाठी तुम्ही एकटे जबाबदार नसता. स्वतःला माफ करा.
जुने मेसेज वाचणे किंवा सोशल मीडियावर जोडीदाराला शोधणे थांबवा. संपर्क पूर्णपणे तोडल्याने मन आणि मेंदूला सावरण्यास मदत होते.
दुःख, राग किंवा नैराश्य येणे स्वाभाविक आहे. विश्वासू मित्राशी बोला किंवा डायरी लिहा. भावना बाहेर आल्या की मन हलके होईल.
नात्यात तुम्ही स्वतःला विसरला होतात, आता स्वतःसाठी जगा. नवीन छंद जोपासा, आरोग्याकडे लक्ष द्या आणि जे आवडतं ते करा.
एकटे राहणे म्हणजे दुबळेपणा नाही. ही स्वतःला समजून घेण्याची आणि अधिक मजबूत बनण्याची संधी आहे, जी भविष्यातील चांगल्या नात्याचा पाया ठरेल.
स्वतःला एका खोलीत बंद करून घेऊ नका. कुटुंब आणि चांगल्या मित्रांसोबत वेळ घालवा. गरज पडल्यास समुपदेशकाची मदत घ्या.
सावरण्यासाठी वेळ लागतो, घाई करू नका. एक दिवस तुम्ही यातून नक्की बाहेर पडाल आणि पूर्वीपेक्षा अधिक आनंदी आणि आत्मनिर्भर व्हाल.