Lambasingi Snow Fall: दक्षिण भारतात बर्फवृष्टी होणारे ठिकाण आपणास माहित आहे का? पाहा आश्चर्यकारक माहिती

गोमन्तक डिजिटल टीम

दक्षिण भारत

दक्षिण भारत म्हटले की आपल्याला उंच गोपुरांची सुंदर मंदिरे, कॉफीचे मळे, निलगिरीच्या झाडांनी सजलेले रस्ते, स्वच्छ किनारे आठवतात.

Lambasingi Kashmir Of Andhra Pradesh

बर्फवृष्टी होणारे गाव

दक्षिण भारतात तुम्हाला बर्फवृष्टीचा आनंद घेता येईल असे सांगितले तर तुमचा विश्वास बसेल का?

Lambasingi Kashmir Of Andhra Pradesh

आंध्र प्रदेश

आंध्र प्रदेशात एक गाव आहे लंबसिंगी जिथे तुम्ही बर्फवृष्टी अनुभवू शकता.

Lambasingi Kashmir Of Andhra Pradesh

लंबसिंगी

समुद्रसपाटीपासून १००० मीटर उंचीवर वसलेल्या लंबसिंगी हिल स्टेशनला ‘आंध्र प्रदेशचे काश्मीर’ असे संबोधले जाते.

Lambasingi Kashmir Of Andhra Pradesh

विलक्षण दर्‍या

निसर्गसौंदर्याने नटलेल्या दर्‍या आणि थंड हवामान असणारे ‘लंबसिंगी’ हे दक्षिणेतील बर्फवृष्टी होणारे एकमेव ठिकाण आहे.

Lambasingi Kashmir Of Andhra Pradesh

पांढरेशुभ्र

हिवाळ्यात लंबसिंगीचे तापमान शून्य अंश सेल्सिअस इतके कमी होते आणि बर्फाच्या चादरीमुळे गाव पांढरेशुभ्र दिसते.

Lambasingi Kashmir Of Andhra Pradesh

आदिवासी समुदायाचा प्रदेश

लंबसिंगी स्वतंत्र आदिवासी समुदायाचा प्रदेश आहे. हे आदिवासी मिरपूड आणि कॉफीच्या मळ्यात काम करतात.

Lambasingi Kashmir Of Andhra Pradesh

कसे जाल

लंबासिंगीचे सर्वात जवळचे विमानतळ विशाखापट्टणम विमानतळ आहे, जे लंबासिंगीपासून १०७ किमी अंतरावर आहे. विशाखापट्टणम येथून बससेवा उपलब्ध आहे.

Lambasingi Kashmir Of Andhra Pradesh
5 Budget Solo Trip