Lakhpat Fort: 15 हजारांची वस्ती थेट 'Ghost Town' बनली! नदीने सोडली साथ अन् व्यापारी झाले कंगाल; अब्जाधीशांच्या लखपत किल्ल्याची थरारक कहाणी

Manish Jadhav

'लखपत' नावाचा इतिहास

18व्या शतकात या समृद्ध बंदरातून दररोज 1 लाख 'कोरी' चलनाची महसूल म्हणून कमाई होत असे, म्हणूनच याला 'लखपत' नाव पडले.

Lakhpat Fort | Dainik Gomantak

'कुंवारा किल्ला' ओळख

या किल्ल्याच्या भक्कम बांधणीमुळे कोणत्याही परकीय आक्रमकाला किंवा राजाला हा किल्ला कधीही युद्ध करुन जिंकता आला नाही.

Lakhpat Fort | Dainik Gomantak

7 किलोमीटरची भव्य तटबंदी

सिंध प्रांतातील शत्रूंपासून रक्षण करण्यासाठी जमादार फतेह मोहम्मद यांनी या किल्ल्याभोवती 24 बुरुजांची 7 किलोमीटर लांब भिंत बांधली.

Lakhpat Fort | Dainik Gomantak

सिंधू नदीचा बदललेला प्रवाह

1819 मधील भीषण भूकंपामुळे जमिनीचा भाग उंचावला आणि सिंधू नदीने प्रवाह बदलल्याने हे समृद्ध बंदर एका रात्रीत उद्ध्वस्त झाले.

Lakhpat Fort | Dainik Gomantak

ओसाड 'भुतहा शहर'

व्यापार पूर्णपणे ठप्प झाल्यामुळे 15 हजारांहून अधिक लोकसंख्या असलेले हे शहर हळूहळू रिकामे झाले आणि आज तिथे मोजकीच कुटुंबे राहतात.

Lakhpat Fort | Dainik Gomantak

गुरु नानक देवांचे वास्तव्य

मक्का-मदीना यात्रेला जाताना गुरु नानक देव येथे राहिले होते; त्यांच्या स्मृत्यर्थ येथे ऐतिहासिक 'गुरुद्वारा लखपत साहिब' उभारण्यात आले.

Lakhpat Fort | Dainik Gomantak

सर्वधर्मसमभावाचे प्रतीक

किल्ल्याच्या आत हिंदू-मुस्लिम दोन्ही धर्मात पूजले जाणारे सुफी संत पीर घौस मोहम्मद यांचा भव्य काळ्या दगडातील कोरीव मकबरा आहे.

Lakhpat Fort | Dainik Gomantak
आणखी बघआ