Junagadh Fort: महालाच्या छतावर अस्सल सोन्याची कलाकुसर, 6 शासकांची सत्ता आणि शतकांचा इतिहास; सपाट मैदानावर 'जुनागड' जगातील सर्वात सुरक्षित किल्ला कसा बनला?

Manish Jadhav

जुनागड किल्ला

जुनागड किल्ल्याचे मूळ नाव 'चिंतामणी' असे होते. बिकानेरचे सहावे शासक राजा रायसिंग यांनी इ.स. 1589 ते 1593 दरम्यान या किल्ल्याची निर्मिती केली. हा किल्ला त्याच्या अभेद्य तटबंदीसाठी ओळखला जातो.

junagadh fort | Dainik Gomantak

'जुनागड' नावाचा रंजक इतिहास

20व्या शतकात जेव्हा राजघराणे हा किल्ला सोडून 'लालगढ पॅलेस'मध्ये राहण्यास गेले, तेव्हा या जुन्या वास्तूला 'जुनागड' (म्हणजेच जुना किल्ला) असे नाव देण्यात आले.

junagadh fort | Dainik Gomantak

मुघल दरबारातील पराक्रमी शासक

राजा रायसिंग हे मुघल सम्राट अकबर आणि जहांगीर यांच्या दरबारातील एक अत्यंत प्रभावशाली सेनापती होते. त्यांनी अनेक युद्धे जिंकली आणि त्यातून मिळालेल्या संपत्तीचा वापर या किल्ल्याच्या अंतर्गत सौंदर्यीकरणासाठी केला.

junagadh fort | Dainik Gomantak

शत्रूला कधीही न झुकलेला!

जुनागड किल्ल्यावर इतिहासात अनेक आक्रमणे झाली, मात्र शत्रूला हा किल्ला कधीही पूर्णपणे जिंकता आला नाही. केवळ कामरान (हुमायूनचा भाऊ) याने एका दिवसासाठी बिकानेरवर ताबा मिळवला होता, पण तोही हा किल्ला टिकवू शकला नाही.

junagadh fort | Dainik Gomantak

वास्तुकलेचा अनोखा त्रिवेणी संगम

या किल्ल्याच्या रचनेत अकबराच्या काळातील मुघल शैली, राजपुताना संस्कृती आणि नंतरच्या काळात ब्रिटीश (पाश्चात्य) स्थापत्यकलेचा प्रभाव पाहायला मिळतो. लाल दगड आणि संगमरवरी दगडांचा वापर करुन हा किल्ला सजवला आहे.

junagadh fort | Dainik Gomantak

किल्ल्यातील अंतर्गत महालांचे वैभव

किल्ल्याच्या आत असलेले अनुप महल, कारंजांनी सजलेले 'बादल महल' आणि काचेचे कोरीव काम असलेले 'चंद्र महल' राजेशाही वैभवाची साक्ष देतात. यात सोन्याच्या पानांचा (Gold Leaf) अप्रतिम वापर केला.

junagadh fort | Dainik Gomantak

पहिल्या महायुद्धातील विमानाचे रहस्य

जुनागड किल्ल्याच्या संग्रहालयात पहिल्या महायुद्धातील 'डी हॅविलँड 9' (DH.9) नावाचे एक दुर्मिळ लढाऊ विमान ठेवण्यात आले आहे. ब्रिटीश सरकारने बिकानेरचे महाराज गंगासिंग यांच्या युद्धकाळातील सेवेचा गौरव म्हणून हे विमान भेट दिले होते.

junagadh fort | Dainik Gomantak

Ranthambore Fort: जगातील एकमेव तीन डोळ्यांचा गणपती, बुरुजांच्या छायेत वसलेलं दिव्य स्थान; वाचा रणथंबोरच्या 'त्रिनेत्र गणपती'ची गाथा

Ranthambore Fort | Dainik Gomantak
आणखी बघा