Akshata Chhatre
पाकिस्तानातील लाहोर हे रामायणातील प्रभू श्रीरामाचे पुत्र लव यांनी वसवले, असे मानले जाते. त्यावेळी या शहराचे नाव होते लवपूर किंवा लवपुरी म्हणजेच "लवाचे शहर" असा होतो.
कालांतराने लवपुरीचे रूपांतर लहोर आणि शेवटी लाहोर या नावात झाले.
काही विद्वानांचे म्हणणे आहे की, लाहोर हे नाव रावी नदीशी संबंधित संस्कृत शब्दांपासून आले असावे.
एक मत असेही आहे की लाहोर हे नाव लोहार (लोखंडी काम करणारा) या शब्दापासून आले आहे, किंवा लोह या शब्दापासून उगम पावले आहे.
इतिहासात लाहोरचे अनेक नावांनी उल्लेख आढळतात: लुहावर, लाहनूर, रहवार इत्यादी.
वादग्रस्त शहर
लाहोरच्या नावाचा उगम जरी वादग्रस्त असला, तरी ते एक पौराणिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरांचे शहर आहे.