Sameer Amunekar
उन्हाळ्यात थंडगार आईसक्रीम खाल्लं की एक वेगळीच मजा वाटते. पण ही मजा तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकते, जर योग्य काळजी घेतली नाही तर.
थंड आईसक्रीम अचानक खाल्ल्यास घशाला संसर्ग होण्याची शक्यता वाढते. घशात दुखणं, खवखव, खोकला, ताप असे त्रास होऊ शकतात.
बाहेर मिळणाऱ्या आईसक्रीममध्ये स्वच्छतेचा अभाव असतो. बर्फ योग्य प्रकारे साठवलेलं नसेल, दूध शिजवलेलं नसेल किंवा विक्रेत्याचे हात स्वच्छ नसतील तर फूड पॉइझनिंग होऊ शकतं.
कृत्रिम रंग, फ्लेवर किंवा प्रेझर्वेटिव्ह्समुळे काही लोकांना त्वचेवर पुरळ, श्वास घेण्यात अडचण, डोळ्यांची खवखव इ. ऍलर्जिक प्रतिक्रिया होऊ शकतात.
प्रत्येक बॉलमध्ये मोठ्या प्रमाणावर साखर आणि चरबी असते. सतत आईसक्रीम खाल्ल्यास वजन वाढू शकतं आणि मधुमेहाचा धोका निर्माण होतो.
शक्यतो घरगुती किंवा विश्वासार्ह ब्रँडचंच आईसक्रीम खा. उघड्यावर मिळणारं आईसक्रीम टाळा.