Sameer Panditrao
कुर्सियांग हे पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग जिल्ह्यात असलेले एक लहान पण सुंदर हिल स्टेशन आहे.
हे समुद्रसपाटीपासून अंदाजे १,४५८ मीटर (४,७८३ फूट) उंचीवर आहे.
कुर्सियाँगचे सौंदर्य हिरवळीने नटलेल्या टेकड्या, चहाचे मळे, ढगांनी वेढलेले रस्ते आणि ब्रिटिशकालीन वास्तुकलेत आहे.
येथून कांचनजंगा शिखरांचे आणि सूर्यास्ताचे अद्भुत दृश्य पाहता येते.
हे हिल स्टेशन पांढऱ्या ऑर्किड्सची भूमी म्हणून ओळखले जाते.
हिल कार्ट रोडवरील टॉय ट्रेनचा प्रवास खूप रोमांचक आहे.
रेल्वेतून न्यू जलपाईगुड़ी स्टेशन, विमानाने बागडोगरा विमानतळ जवळ पडते. कारने जात असला तर दार्जिलिंगमार्गे रस्ता सोपा आहे.