Ashutosh Masgaunde
भारतीय संघासाठी आतापर्यंत 33 टी-20 सामने खेळलेल्या कुलदीपने 14.28 च्या सरासरीने 53 विकेट्स घेतल्या आहेत. तो या फॉरमॅटमध्ये सर्वात वेगवान 50 बळी घेणारा भारताचा गोलंदाज बनला आहे.
टीम इंडियाची फिरकी जोडी रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव यांनी एकाच वनडे मध्ये 10 पैकी 7 विकेट घेतल्या होत्या. वन डे क्रिकेटच्या इतिहासात एकाच सामन्यात 7 बळी घेणारे पहिले दोन डावखुरे फिरकीपटू ठरले आहेत.
कुलदीप वन डे मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा डावखुरा फिरकी गोलंदाज बनला आहे. त्याने 123 एकदिवसीय सामन्यांच्या 113 डावात 156 बळी घेणारा ऑस्ट्रेलियाच्या ब्रॅड हॉगचा विक्रम मोडला.
मार्च 2017 मध्ये, कुलदीप भारताचे प्रतिनिधित्व करणारा पहिला पुरुष चायनामन गोलंदाज ठरला.
सर्वात जलद 150 एकदिवसीय विकेट्स पूर्ण करणाऱ्या फिरकीपटूंच्या यादीत कुलदीप चौथ्या स्थानी आहे. या यादीत सकलेन मुश्ताक (78 सामने), राशिद खान (80 सामने) आणि अजंता मेंडिस (84 सामने) त्याच्या पुढे आहेत.
कुलदीपने 2014 च्या ICC अंडर-19 विश्वचषक स्पर्धेत स्कॉटलंडविरुद्ध हॅट्ट्रिक घेतली होती. यासह, अंडर-19 विश्वचषकात हॅट्ट्रिक घेणारा तो पहिला भारतीय गोलंदाज ठरला.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोनदा हॅट्ट्रिक घेणारा कुलदीप यादव हा पहिला भारतीय गोलंदाज आहे.