गोमन्तक डिजिटल टीम
गोव्यात दहीहंडी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. हेडगेवार विद्यामंदिराच्या विद्यार्थ्यांनी चिखलकाला साजरा करत पारंपरिक पद्धतीने दहीहंडी फोडली.
श्री महालक्ष्मी मंदिराकडून कृष्णराधेच्या वेशात शोभायात्रा काढली. विविध सांस्कृतिक कार्यक्रम साजरे केले तर विद्यार्थ्यांसाठी पुस्तक हंडी असा कार्यक्रम ठेवला होता.
श्री नागेश संस्थानच्या सप्ताहसमाप्तीवेळी आयोजित दहीहंडी कार्यक्रमात गोविंदांनी पावसात चिंब भिजून आनंद लुटला.
जनता पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक विद्यालयाच्या मुलांनी जन्माष्टमी निमित्त विविध कार्यक्रम सादर केले. मिरवणुकीनंतर दहीहंडी फोडण्यात आली.
गोविंदा रे गोपाळाच्या तालावर येथील शांतादुर्गा माध्यमिक विद्यालयातर्फे पावसाची पर्वा न करता दहीहंडी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
साळ डिचोली येथील सरकारी प्राथमिक विद्यालयात श्रीकृष्ण जन्माष्टमीचे औचित्य साधून लोणी बनवण्याची पारंपरिक ‘लोणी मंथन’ कार्यशाळा उत्साहात पार पाडली.
मडगावच्या पॉप्युलर पूर्व प्राथमिक व माध्यमिक विद्यार्थ्यांनी नृत्य, गोवर्धन पर्वत ही नाटिका सादर केली. वेशभूषा, एकपात्री अभिनय, हंडी रंगवा अशा विविध स्पर्धा झाल्या.
शेणवीवाडा येथील श्रीकृष्ण मंदिरात सोमवार २६ रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त शिरोडा पंचक्रोशीतील मुलांसाठी वेशभूषा व दहीहंडी फोडण्याची स्पर्धा आयोजित केली होती.