गोमन्तक डिजिटल टीम
" बा वेताळा, एके काळी चोपडे गाव तू वसवलास. आज या गावावर परप्रांतीयांची नजर गेलेली आहे " असे गाऱ्हाणे चोपडे ग्रामस्थांनी देवाला घातले.
ग्रामस्थांनी दर्यासम्राट वेताळ देवाला गाऱ्हाणे घालण्यामागे कारण काय आहे ते आपणास माहित आहे का?
केवळ २०० लोकसंख्या असलेल्या डोंगर माथ्यावर २००ते ४०० घरांचा प्रकल्प होऊ घातला आहे. त्यामुळे चोपडे गावाचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
डोंगर माथ्यावर असलेल्या या प्रकल्पच्या अस्तित्वमुळे चोपडे गावावर सांडपाणी, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उपस्थित राहणार आहे.
पर्यावरणाच्या दृष्टीने अति संवेदनशील असताना या डोंगर उतरणीवरील जमिनीचे रूपांतरण कसे काय झाले असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे.
चोपडे डोंगरमाथ्यावर बिबट्यांचा संचार आहे. काही दिवसांमागे वन खात्याच्या पिंजऱ्यात बिबटा अडकला होता. आणखी वन्यप्राणीही या डोंगरावर आढळतात.
या ठिकाणी बांधकामांसोबत मोठ्या प्रमाणात कुपनलिका खोदण्यात आल्या असल्याने सरकारने याचा विचार करावा अशी मागणी होत आहे.
ही स्थानिकांसाठी धोक्याची घंटा आहे, आमचे अस्तित्व संपुष्टात येण्यास उशीर लागणार नाही असेही नागरिकांचे मत आहे.
बेकायदा जमीन रूपांतर मागे न घेतल्यास स्थानिक न्यायालयात जाण्याची तसेच एकत्रित लढा देण्याच्या तयारीत आहेत.