Sameer Panditrao
भारतात एक सुंदर चंद्रकोरी किनारा आहे.
कोवलम बीच हे केरळमधील तिरुवनंतपुरम शहरात आहे.
त्रावणकोरच्या महाराजांच्या पुतण्याने हे ठिकाण लोकांसमोर आणले.
युरोपियन पाहुण्यांनी १९३० च्या दशकात कोवलम समुद्रकिनारा एक पर्यटन स्थळ म्हणून शोधून काढला.
१९७० च्या दशकाच्या सुरुवातीस अनेक हिप्पी पायवाटेने सिलोनला आले, ज्यामुळे केरळच्या या मासेमारी गावाचे एका महत्त्वपूर्ण पर्यटन स्थळात रूपांतर झाले.
कोवलमच्या १७ किमी किनारपट्टीवर खडकाळ भागाने विभक्त केलेले तीन समुद्रकिनारे आहेत, तिघे मिळून कोवलम समुद्रकिनाऱ्याची चंद्रकोर बनतात.
कोवलमच्या आजूबाजूचे समुद्रकिनारे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही प्रवाश्यांसाठी सुट्टीतील लोकप्रिय ठिकाणे आहेत.