Manish Jadhav
कर्जत जवळील पेठ गावापाशी असलेला कोथळीगड त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण सुळक्यासाठी प्रसिद्ध आहे, जो एखाद्या कोठारासारखा (कोथळी) दिसतो.
या किल्ल्याचे मुख्य आकर्षण म्हणजे सुळक्याच्या आतून कोरलेला अनोखा भुयारी जिना, जो शत्रूच्या संरक्षणासाठी बनवला होता.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या किल्ल्याचा वापर आजूबाजूच्या प्रदेशावर नजर ठेवण्यासाठी आणि लष्करी रसद साठवण्यासाठी केला जात असे.
सह्याद्रीच्या कुशीत असलेला हा किल्ला शिवकाळातील प्रमुख व्यापारी केंद्र 'कल्याण आणि भिवंडी' सुभ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी महत्त्वाचा होता.
1684 मध्ये मुघलांनी हा किल्ला जिंकून याचे नाव 'मिफ्ताहुलफत' ठेवले, मात्र नंतर मराठ्यांनी तो पुन्हा आपल्या ताब्यात घेतला.
1716 च्या सुमारास पेशवे बाळाजी विश्वनाथ यांच्या काळात मराठ्यांनी या किल्ल्याची तटबंदी मजबूत करून स्वराज्यासाठी सज्ज ठेवली.
1818 मध्ये ब्रिटिशांनी हा किल्ला जिंकला, परंतु 1824 मध्ये क्रांतिकारक उमाजी नाईक यांच्या सहकाऱ्यांनी येथे ब्रिटिशांविरुद्ध आश्रय घेतला होता.