Sameer Amunekar
अलिबागपासून मुरूड-जंजिर्याच्या दिशेने १५ किमी अंतरावर रेवदंड्याचा कोट आहे, आणि पुढे ८ किमी अंतरावर कोर्लई किल्ला वसलेला आहे.
१५२१ मध्ये पोर्तुगीज गव्हर्नर दियोगु लोपिश दि सिकैरने रेवदंड्याजवळ चौलच्या खडकावर धक्का आणि क्रुसाची बातेरी बांधण्यास परवानगी घेतली. रेवदंडा हे पोर्तुगीजांचे मुख्य ठाणे बनले.
१५९४ साली बुर्हाण निजामच्या मृत्यूनंतर अस्थिरतेचा फायदा उचलून पोर्तुगीजांनी चौलच्या खडकावर तटबंदी बांधण्याचा प्रयत्न केला.
हुसेन निजामाने पोर्तुगीजांना नकार दिला आणि स्वतः बळकट दुर्ग उभारण्याचे ठरवले. मात्र नंतर दुसऱ्या बुर्हाण निजामाने मात्र पोर्तुगीजांचा विरोध न करता पक्का किल्ला बांधला.
फत्तेखान या सरदाराने रेवदंड्यावर तोफा झाडल्याने पोर्तुगीजांनी कोर्लईवर हल्ला केला; गडाखालच्या पेठेत घुसून निजामाचा एक हत्ती मारला आणि शेवटी किल्ला ताब्यात घेतला.
१६०२ साली कोर्लईवर ८००० शिबंदी तैनात होते. पोर्तुगीजांनी बालेकिल्ला ठेवून अनेक बांधकाम पाडले.
१६८३ मध्ये संभाजी महाराजांनी कोर्लईवर अयशस्वी प्रयत्न केला; १७३९ साली चिमाजीअप्पाने सुभानराव माणकराला पाठवून वर्षभरात किल्ला ताब्यात घेतला. बुरुजांची नावे बदलून सां दियागोचे नाव ‘पुस्ती बुरूज’, सां फ्रांसिसकुचे नाव ‘गणेश बुरूज’ ठेवले.