Manish Jadhav
छत्रपती शिवाजी महाराजांनी 1673 मध्ये विजापूरच्या आदिलशाहीवर स्वारी करुन हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला आणि स्वराज्याचे तोरण येथेही फडकवले.
शिवरायांनी हा किल्ला जिंकल्यानंतर याचे जुने नाव 'सातारा किल्ला' बदलून त्याचे 'अजिंक्यतारा' असे अत्यंत भव्य आणि साजेसे नामकरण केले.
कर्नाटक मोहिमेवरुन परतल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज या किल्ल्यावर काही काळ वास्तव्यास होते. याच ठिकाणी राजे गंभीर आजारी पडले होते, तेव्हा त्यांची सुश्रूषा याच किल्ल्यावर झाली होती.
किल्ल्यावर असलेले मंगळादेवीचे मंदिर शिवरायांच्या काळातील मानले जाते. या देवीचे दर्शन घेऊन महाराज मोहिमेवर निघत असत, अशी ऐतिहासिक मान्यता आहे.
शिवरायांनी घेतलेल्या या किल्ल्याला पुढे छत्रपती राजाराम महाराज आणि छत्रपती शाहू महाराजांच्या काळात मराठा साम्राज्याची चौथी राजधानी बनण्याचा बहुमान मिळाला.
शिवरायांनी दक्षिण दिग्विजय आणि स्वराज्याच्या संरक्षणासाठी अजिंक्यतारा किल्ल्याचा वापर एक महत्त्वाचे लष्करी केंद्र आणि सातारा भागातील प्रशासकीय केंद्र म्हणून केला होता.
शिवरायांनी निर्माण केलेल्या या मजबूत तटबंदीमुळेच पुढे राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर, महाराणी ताराबाई यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी या किल्ल्यावरुन मुघलांविरुद्ध तब्बल 6 महिने अजिंक्य लढा दिला होता.