Manish Jadhav
रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर साचलेली धूळ, प्रदूषण आणि मेकअप काढण्यासाठी कोरियन महिला सगळ्यात आधी ऑइल-बेस्ड क्लिन्झरचा वापर करतात. यामुळे त्वचेची छिद्रे मोकळी होतात.
पहिल्या पायरीनंतर, चेहऱ्यावर उरलेली घाण पूर्णपणे साफ करण्यासाठी सौम्य फेसवॉश किंवा फोम क्लिन्झरने चेहरा स्वच्छ धुवून घेतला जातो. याला डबल क्लिन्झिंग म्हटले जाते.
चेहरा धुतल्यानंतर त्वचेचा ओलावा (pH स्तर) टिकवून ठेवण्यासाठी अल्कोहोल-फ्री टोनर लावले जाते. यामुळे त्वचा पुढील स्किनकेअर उत्पादने शोषून घेण्यासाठी तयार होते.
ग्लास स्किनचे सर्वात मोठे रहस्य म्हणजे इसेंस किंवा स्नेल म्युसिन! हे त्वचेला आतून पोषण देते, कोरडेपणा दूर करते आणि चेहऱ्यावर नैसर्गिक चमक आणते.
चेहऱ्यावर असलेले काळे डाग, पिंपल्सचे मार्क्स आणि बारीक रेषा घालवण्यासाठी त्या रात्रीच्या वेळी पोषक सिरम चेहऱ्यावर हलक्या हाताने लावतात.
स्लीपिंग मास्क किंवा नाईट क्रिम
सगळ्यात शेवटी, चेहऱ्यामधील ओलावा रात्रभर लॉक करुन ठेवण्यासाठी ते हायड्रेटिंग स्लीपिंग मास्क किंवा मॉइश्चरायझर लावतात, ज्यामुळे सकाळी उठल्यावर चेहरा अगदी तजेलदार दिसतो.
डोळ्यांखालील अत्यंत नाजूक त्वचेची काळजी घेण्यासाठी आणि काळी वर्तुळे घालवण्यासाठी कोरियन महिला नियमितपणे विशेष आय क्रीम वापरतात.