Manish Jadhav
डबल मॉइश्चरायझिंग म्हणजे त्वचेला एकाऐवजी दोन टप्प्यांत मॉइश्चराइज करणे. यात आधी हलके वॉटर-बेस्ड मॉइश्चरायझर किंवा सिरम आणि नंतर क्रिम-बेस्ड मॉइश्चरायझर वापरले जाते.
पहिल्या टप्प्यातील हलके सिरम किंवा एसेन्स त्वचेच्या पहिल्या थरामध्ये शोषले जाते.
दुसऱ्या टप्प्यात लावलेले जाडसर क्रिम किंवा इमल्शन त्वचेवर एक संरक्षक थर तयार करते, ज्यामुळे आतला ओलावा बाहेर निघून जात नाही.
थंडीमुळे त्वचेवर येणारा रुक्षपणा आणि चट्टे दूर होतात. रोज हा नियम पाळल्यास त्वचा अधिक मऊ, मऊसर आणि नैसर्गिकरीत्या चमकदार दिसू लागते.
पहिल्या लेयरसाठी हायड्रेटिंग इंग्रिडिएंट्स जसे की हायालुरॉनिक ॲसिड किंवा ॲलोव्हेरा जेल आणि दुसऱ्या लेयरसाठी सेरामाईड्स किंवा शिया बटर असणारे क्रिम वापरावे.
सकाळी चेहरा धुतल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी ही पद्धत वापरणे सर्वात फायदेशीर ठरते. थोडेसे ओल्या त्वचेवरच पहिली लेयर लावल्यास जास्त फायदा होतो.
ही पद्धत फक्त ड्राय स्किनसाठीच नाही, तर ऑईली किंवा कॉम्बिनेशन स्किन असलेले लोकसुद्धा आपल्या त्वचेनुसार हलके मॉइश्चरायझर निवडून वापरु शकतात.