Korean Skincare Secrets: तुम्ही दिवसभर स्क्रीनसमोर बसता का? मग कोरियन महिलांची 'ही' ब्यूटी टीप नक्की ट्राय करा!

Manish Jadhav

'ब्लू लाईट' धोकादायक असतो!

मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही आणि एलईडी बल्बमधून 'ब्लू लाईट' सतत बाहेर पडतो. हा प्रकाश उन्हातील सूर्यकिरणांप्रमाणेच त्वचेच्या खोल थरांपर्यंत जाऊन नुकसान पोहोचवतो.

Korean Glass Skin | Dainik Gomantak

वयाच्या आधीच चेहऱ्यावर सुरकुत्या येतात!

तासनतास स्क्रीनसमोर बसल्याने स्क्रीनचा प्रकाश त्वचेतील कॉलाजन नष्ट करतो. यामुळे वयाच्या आधीच चेहऱ्यावर बारीक रेषा, सुरकुत्या आणि त्वचा सैल पडण्याची समस्या निर्माण होते.

Korean Glass Skin | Dainik Gomantak

चेहऱ्यावर काळे डाग पडतात!

स्क्रीनच्या प्रकाशामुळे त्वचेमध्ये 'मेलानिन'चे प्रमाण अचानक वाढते. यामुळे चेहऱ्यावर काळे डाग, वांग आणि डार्क सर्कल्स पडू लागतात. रोज सनस्क्रीन लावल्याने हे डाग रोखता येतात.

Korean Glass Skin | Dainik Gomantak

सूर्यकिरण त्वचेला खराब करतात

तुम्ही घरात किंवा ऑफिसमध्ये बसलेले असलात तरी खिडकीच्या काचेतून UVA किरण सहज आत येतात. हे किरण त्वचेची लवचिकता कमी करतात, त्यामुळे घरातही सनस्क्रीनचे कवच गरजेचे असते.

Korean Glass Skin | Dainik Gomantak

स्क्रीन रेडिएशन

स्क्रीनच्या रेडिएशनमुळे त्वचा कोरडी, सुस्त आणि संवेदनशील बनते. सनस्क्रीन लावल्यामुळे त्वचेवर एक संरक्षक थर तयार होतो, ज्यामुळे त्वचेतील ओलावा बाहेर निघून जात नाही.

Korean Glass Skin | Dainik Gomantak

घरात लावताना 'हलके सनस्क्रीन' निवडावे!

घरात किंवा ऑफिसमध्ये असताना खूप चिपचिप किंवा पांढरा थर सोडणारे क्रीम लावण्याची गरज नाही. घरात वापरण्यासाठी जेल-बेस्ड किंवा हलके सनस्क्रीन सर्वोत्तम ठरते.

Korean Glass Skin | Dainik Gomantak

दर 3 ते 4 तासांनी सनस्क्रीन पुन्हा लावावे!

कोरियन महिला सकाळी एकदाच सनस्क्रीन लावून थांबत नाहीत. स्क्रीनसमोर जास्त वेळ काम करताना त्या दर 3 ते 4 तासांनी सनस्क्रीन पुन्हा (Re-apply) लावतात, ज्यामुळे त्यांची त्वचा नेहमी डागरहित आणि तजेलदार दिसते.

Korean Glass Skin | Dainik Gomantak

Battle Of Purandar Fort: 700 मावळ्यांसह मुघलांच्या सैन्यावर तुटून पडले, दिलेरखानाला धडकी भरवली; मुरारबाजीच्या बलिदानाचा थरारक इतिहास

आणखी बघा