Manish Jadhav
कोरियन महिलांच्या सकाळच्या नाश्त्यामध्ये प्रक्रिया केलेल्या अन्नाऐवजी शक्य तितक्या ताज्या आणि नैसर्गिक पदार्थांचा समावेश असतो.
कोरियन संस्कृतीत नाश्त्याला सूप पिण्याला खूप महत्त्व आहे. पालेभाज्या किंवा सी-फूडपासून बनवलेले हलके सूप त्यांचे पोट दिवसभर हलके ठेवते.
कोरियन जेवणाचा आत्मा मानली जाणारी किमची (एक प्रकारची फर्मेंटेड कोबी किंवा भाज्या) त्यांच्या प्रत्येक आहारात असते. हे पचनक्रिया सुधारण्यासाठी उत्तम मानले जाते.
मैद्याचे पदार्थ टाळून, त्याऐवजी ते नाश्त्यात स्टीम भात किंवा पौष्टिक तृणधान्ये खाणे पसंद करतात.
स्नायू मजबूत आणि त्वचा टवटवीत ठेवण्यासाठी त्यांच्या नाश्त्यात उकडलेली अंडी, टोफू किंवा माशांचा समावेश असतो.
कोरियन खाद्यपदार्थ तळलेले नसतात. ते वाफवून (Steam), उकळून किंवा कमीत कमी तेलात ग्रील करुन खाण्यावर भर देतात.
चहा किंवा कॉफी पिण्याऐवजी कोरियन महिला सकाळच्या वेळी ग्रीन टी किंवा नैसर्गिक हर्बल टी पिणे जास्त पसंत करतात, ज्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात.