Glowing Skin: पार्लरशिवाय मिळवा कोरियन ग्लो; 'शीट मास्क' ठरतोय मुलींची पहिली पसंती

Manish Jadhav

शीट मास्क

कोरियन स्किनकेअरमध्ये 'शीट मास्क'ला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आठवड्यातून किमान 2 ते 3 वेळा शीट मास्क वापरणे मुलींना खूप आवडते, कारण यामुळे चेहऱ्याला झटपट ग्लो येतो.

Sheet Mask | Dainik Gomantak

व्हिटॅमिन्सचा खजिना!

शीट मास्क हे वेगवेगळ्या सिरममध्ये भिजवलेले असतात. यामुळे त्वचेला भरपूर प्रमाणात जीवनसत्त्वे (Vitamins) आणि पोषक घटक मिळतात, जे त्वचेला आतून निरोगी बनवतात.

Sheet Mask | Dainik Gomantak

योग्य पद्धत निवडा

शीट मास्क लावण्यापूर्वी चेहरा क्लींजरने स्वच्छ धुणे अत्यंत आवश्यक आहे. स्वच्छ चेहऱ्यावर मास्क लावल्यास त्यातील पोषक घटक त्वचेमध्ये व्यवस्थित शोषले जातात.

Sheet Mask | Dainik Gomantak

फक्त 15 ते 20 मिनिटे!

शीट मास्क चेहऱ्यावर फक्त 15 ते 20 मिनिटेच ठेवावा. तो पूर्णपणे सुकेपर्यंत ठेवू नये, कारण जास्त वेळ ठेवल्यास तो त्वचेतील नैसर्गिक ओलावा उलट शोषून घेऊ शकतो.

Sheet Mask | Dainik Gomantak

चेहऱ्यावर करा हलका मसाज

मास्क काढल्यानंतर चेहरा धुण्याची अजिबात गरज नाही. चेहऱ्यावर आणि गळ्यावर राहिलेले अतिरिक्त सिरम बोटांच्या साहाय्याने हलका मसाज करुन त्वचेत जिरु द्यावे.

Sheet Mask | Dainik Gomantak

टवटवीतपणा आणतो

एखाद्या पार्टीला किंवा कार्यक्रमाला जाण्यापूर्वी झटपट उजळपणा हवा असल्यास शीट मास्क उत्तम काम करतो. हा त्वचेचा थकवा दूर करुन चेहऱ्यावर तात्काळ टवटवीतपणा आणतो.

Sheet Mask | Dainik Gomantak

रात्री वापरणे अधिक फायदेशीर!

शीट मास्क रात्री झोपण्यापूर्वी वापरल्यास जास्त फायदा होतो. रात्रभर त्वचेला आराम मिळतो आणि सकाळी उठल्यावर चेहरा कमालीचा चमकदार आणि फ्रेश दिसतो.

Sheet Mask | Dainik Gomantak

बाजीराव पेशव्याची निती अन् रणधुरंधर 'चिमाजी अप्पा'चं शौर्य, 'वसई'च्या छाताडावर फडकला मराठ्यांचा भगवा; सफर थरारक इतिहासाची

आणखी बघा