Manish Jadhav
दिवसभर फिरल्यामुळे चेहऱ्यावर जी धूळ, माती आणि चिकट घाण साचते, ती एका साध्या फेसवॉशने जात नाही.
चेहऱ्यावर लावलेला मेकअप किंवा सनस्क्रीन त्वचेच्या आत चिकटून राहतो, जो डबल क्लिंजिंग केल्याशिवाय पूर्णपणे निघत नाही.
पहिल्यांदा ऑइल-बेस्ड क्लिंजर लावल्याने चेहऱ्यावरचा सर्व मेकअप आणि तेल विरघळून सहज बाहेर येते.
ऑइल क्लिनिंगनंतर वॉटर-बेस्ड फेसवॉश वापरल्याने त्वचा अगदी चकाचक आणि स्वच्छ होते.
चेहरा दोनदा साफ केल्यामुळे त्वचेचे बंद झालेले पोर्स पूर्णपणे मोकळे होतात आणि त्वचा मोकळा श्वास घेऊ शकते.
चेहऱ्यावर घाण साचत नाही, त्यामुळे पिंपल्स, काळे डाग आणि व्हाईटहेड्सची समस्या अजिबात होत नाही.
चेहरा पूर्णपणे स्वच्छ झाल्यामुळे रात्री लावले जाणारे सीरम, टोनर आणि मॉइश्चरायझर त्वचेच्या आत खोलवर मुरतात आणि जादूई चमक देतात.