Manish Jadhav
शीट मास्क लावण्यापूर्वी चेहरा फेस वॉशने पूर्णपणे स्वच्छ करा. चेहऱ्यावर धूळ किंवा मेकअप असल्यास शीट मास्कमधील सिरम त्वचेच्या आत जात नाही.
टोनरचा वापर करा
क्लीन्सिंगनंतर चेहऱ्यावर टोनर लावा. टोनरमुळे त्वचेची पीएच पातळी (pH Level) संतुलित होते आणि त्वचा सिरम शोषून घेण्यासाठी तयार होते.
शीट मास्क चेहऱ्यावर फक्त 15 ते 20 मिनिटेच ठेवावा. तो पूर्णपणे सुकेपर्यंत (Dry) चेहऱ्यावर ठेवू नका; अन्यथा तो त्वचेतील ओलावा उलट शोषून घेतो.
पाकिटात उरलेले अतिरिक्त सिरम फेकून न देता ते मान, हात आणि कोपऱ्यांवर लावा. यामुळे त्या भागाची त्वचाही मऊ आणि हायड्रेटेड राहते.
शीट मास्क काढल्यानंतर चेहरा पाणी किंवा फेस वॉशने धू नये. चेहऱ्यावर राहिलेले सिरम बोटांच्या सहाय्याने हलक्या हाताने टॅप (Tap) करुन त्वचेत जिरवा.
सिरम त्वचेत जिरल्यानंतर त्यावर हलके मॉइश्चरायझर लावा. यामुळे शीट मास्कचा ओलावा आणि सिरमचे पोषण त्वचेमध्ये दीर्घकाळ टिकून (Lock) राहते.
शीट मास्क रोज वापरण्याऐवजी आठवड्यातून 2 ते 3 वेळा वापरणे पुरेसे असते. रात्री झोपण्यापूर्वी शीट मास्क वापरल्यास सकाळी त्वचा अतिशय मऊ आणि चमकदार दिसते.