Manish Jadhav
उन्हाळ्यात त्वचा चिकट आणि तेलकट होते. त्यामुळे हेवी क्रीमऐवजी अलोवेरा किंवा ग्रीन टी युयुक्त हलके वॉटर-बेस्ड किंवा जेल मॉइश्चरायझर वापरा, जे त्वचेला चिकट न करता ओलावा देतात.
कोरियन स्किनकेअरमध्ये सनस्क्रीनला सर्वात जास्त महत्त्व दिले जाते. उन्हाळ्यात युव्ही किरणांपासून संरक्षणासाठी किमान एसपीएफ 50 असलेले ब्रॉड-स्पेक्ट्रम सनस्क्रीन दर 3-4 तासांनी पुन्हा लावा.
घाम आणि धूलिकणांमुळे उन्हाळ्यात रोमछिद्रे लवकर बंद होतात. यासाठी हलक्या ऑइल क्लिन्झरने आणि फोम फेसवॉशने चेहरा स्वच्छ करा, जेणेकरुन चेहऱ्यावर जमा झालेले अतिरिक्त तेल निघून जाईल.
हिवाळ्यात हवेतील कोरडेपणामुळे त्वचेतील ओलावा निघून जातो. या दिवसांत कोरियन महिला सिरॅमाइड्स आणि शेया बटरयुक्त रिच क्रीम वापरतात, जे त्वचेचे रक्षण करतात.
हिवाळ्याच्या मोसमात त्वचेची चमक टिकवण्यासाठी स्किनकेअर रुटीनच्या शेवटी 2 थेंब जोजोबा किंवा आर्गन ऑइल चेहऱ्यावर लावून हलक्या हाताने मसाज करा. यामुळे त्वचा मऊ आणि चमकदार राहते.
थंडीच्या दिवसांत ओठ फाटणे कॉमन आहे. कोरियन ब्युटीनुसार, रात्री झोपण्यापूर्वी ओठांवर थिक लिप बाम किंवा स्लीपिंग लिप मास्क नक्की लावा, जेणेकरुन ओठ गुलाबी आणि मऊ राहतील.
उन्हाळ्यात शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी लिंबू पाणी किंवा नारळ पाणी प्या, तर हिवाळ्यात कोमट पाणी आणि ग्रीन टीचे सेवन करा. तसेच, बदलत्या हवामानानुसार आठवड्यातून 2 वेळा हायड्रेटिंग शीट मास्क वापरा.